१४ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१८८२: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९५३)

१८८३: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७०)

१८९२: भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३)

१८९६: भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२)

१९०५: मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)

१९०८: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.

१९१९: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००२)

१९२३: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९)

१९२६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म.

१९३१: ऊर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)

१९७७: भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.