१४ जुलै रोजी झालेले जन्म.

१८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)

१८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.

१८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)

१८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)

१९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.

१९१७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)

१९२०: केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)

१९४७: मॉरिशसचे तिसरे व सहावे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म.

१९६७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी हशन तिलकरत्ने यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.