१४ जुन रोजी झालेल्या घटना.

११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.

१७०४: मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

१७७७: अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला.

१७८९: मक्यापासुन पहिल्यांदाच व्हिस्की तयार करण्यात आली. तिला बोर्बोन असे नाव देण्यात आले.

१८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.

१९०७: नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार.

१९२६: ब्राझील लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.

१९३८: सुपरमॅनची चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.

१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.

१९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर.

१९५२: अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.

१९६२: पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली – नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.

१९६७: मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.

१९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली.

१९७२: डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.

१९९९: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.

२००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.