१४ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१६५०: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १७०२)

१७१९: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १७८७)

१७६५: वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

१८६३: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

१८८९: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

१८९१: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)

१९०४: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९९५)

१९१८: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९७६)

१९१९: स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९९१)

१९२२: संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.

१९२४: कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००८)

१९३५: जॉर्डनचे राजे हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)

१९४७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)

१९७१: ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट यांचा जन्म.

१९७१: भारतीय शेफ आणि लेखक विकास खन्ना यांचा जन्म.

१९७४: क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.