१४ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१९१९: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८५५)

१९४४: जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १८९१)

१९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८७२)

१९५३: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणसाठी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत र. धों. कर्वे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८२)

१९९३: वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९०४)

१९९४: इतिहासकार, विचारवंत, संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१०)

१९९७: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचे निधन. (जन्म: २१ मे १९१६)

१९९९: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्युलिअस न्येरेरे यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९२२)

२००४: स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२०)

२०१३  केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९२५)

२०१५: भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे निधन. (जन्म: १२ मे १९३०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.