१४ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१७१३: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १७८१)

१८६७: वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग  यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)

१७७४: भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८३९)

१८९७: नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)

१९०१: शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.

१९२१: शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८९)

१९२३: केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म.

१९३२: रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९८६)

१९४८: ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म.

१९५७: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू केपलर वेसेल्स यांचा जन्म.

१९६३: अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.