१५ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१७९४: पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.

१८६५: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १८५०)

१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८७३)

१९८०: फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेआँ-पॉल सार्त्र यांचे निधन. (जन्म: २१ जून १९०५)

१९९०: हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ग्रेटा गार्बो यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०५)

१९९५: तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन.

१९९८: कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता पॉल पॉट यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)

२०१३: संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.