१५ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना.

१५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.

१६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्‍यांदा) पराभूत केले.

१८२४: अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.

१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

१९१४: पनामा कालव्यातून एस. एस. अ‍ॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.

१९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.

१९४५: दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.

१९४७: भारत देश स्वतंत्र झाला.

१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.

१९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.

१९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.

१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.

१९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.

१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.

१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.