१५ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

३७: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून ६८)

६८७: पोप सर्गिअस (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)

१८३२: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.  (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)

१८५२: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)

१८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९३८)

१८९२: गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक जे. पॉल गेटी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९७६)

१९०३: स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)

१९०५: साहित्य अकादमी पुरकर विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)

१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.

१९३२: प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.

१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.

१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)

१९३५: पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.

१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.

१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.