१५ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१८६९: ऊर्दू शायर मिर्झा ग़ालिब यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १७९७)

१९४८: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९०४)

१९५३: किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने यांचे निधन.

१९८०: कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय मनोहर दिवाण यांचे निधन.

१९८०: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष कॉंम्रेड एस. एस. मिरजकर यांचे निधन.

१९८८: क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१८)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.