१५ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१७७९: ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचे एक संस्थापक रॉबर्ट ग्रँट यांचा जन्म.

१९२०: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)

१९२१: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७)

१९२६: भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)

१९२९: गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)

१९३१: मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.

१९४७: पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.

१९५६: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.