१५ जुलै रोजी झालेल्या घटना.

१६६२: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.

१६७४: मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली.

१९२६: मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.

१९२७: र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.

१९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

१९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.

१९९६: पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

१९९७: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

२००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

२०२०: बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.