१५ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१२९१: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचे निधन. (जन्म: १ मे १२१८)

१५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन. (जन्म: १५ जून १४७९)

१९०४: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६०)

१९१९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मान एमिल फिशर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८५२)

१९५३: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे  निधन. (जन्म: २१ सप्टेंबर  १८८२)

१९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन. (जन्म: २६ जून १८८८)

१९७९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.

१९९१: जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.

१९९८: स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन.

१९९९: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.

१९९९: सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचे निधन.

२००४: कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.