१५ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१७३८: जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)

१८७५: झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९००)

१८८५: आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)

१८९१: जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४४)

१९०८: अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू:  २४ ऑक्टोबर १९७९)

१९१७: संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)

१९१४: भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)

१९२७: आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)

१९२९: कवयित्री शिरीष पै यांचा जन्म.

१९३६: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८)

१९४८: कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००३)

१९८६: लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.