१५ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.

१६३०: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १५७१)

१७०६: ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३)

१९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१०)

१९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन.

१९८२: भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)

१९९६: कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन.

२०१२: केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३१)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.