१५ ऑक्टोबर – जन्म

१५४२: तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १६०५)

१६०८: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचे (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १६४७)

१८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म.

१८८१: इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

१८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा जन्म.

१९०८: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल २००६)

१९२०: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९९९)

१९२६: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१०)

१९३१: वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)

१९३४: कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म.

१९४६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.

१९४९: पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.

१९५५: भारतीय फील्ड हॉकी खेळाडू कुलबुर भौर यांचा जन्म.

१९५७: भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका मीरा नायर यांचा जन्म.

१९६९: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा जन्म.