१५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.

१८१२: नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.

१८२१: कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.

१८३५: चार्ल्स डार्विन जहाजातून गॅलापागोस द्वीपात पोहोचले.

१९१६: पहिल्या महायुद्ध – पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर.

१९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.

१९३५: जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.

१९४८: भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.

१९४८: एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.

१९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

१९५९: प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

१९५९: निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते.

१९६८: सोव्हिएत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

१९७८: तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.

२०००: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.

२००८: लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.

२०१३: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.