१५ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१२५४: इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी मार्को पोलो यांचा जन्म. (मृत्यू: ८ किंवा ९ जानेवारी १३२४)

१८६१: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

१८७६: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)

१८८१: इटालियन ऑटोमोबाइल अभियंते एत्तोरे बुगाटी यांचा जन्म.

१८९०: इंग्लिश रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९७६)

१९०५: नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९०)

१९०९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)

१९०९: स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते रत्नाप्पा कुंभार यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९९८)

१९२१: रंगभूमी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)

१९२६: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आग्रा येथे जन्म.

१९३५: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दगडू मारुती तथा दया पवार यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)

१९३९: अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म.

१९४६: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच माईक प्रॉक्टर यांचा जन्म.

१९८९: न्यूझीलंडचा संगीतकार चेतन रामलू यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.