१६ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१७०५: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १६५४)

१८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली. (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ – कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल)

१८८८: कोका-कोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३१)

१९६१: भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८७०)

१९७७: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९३५)

१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.

१९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)

२०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९५२ – नवी दिल्ली)

२००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन.

२०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)

२०१८: भारताचे १० वे पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन (जन्म:२५ डिसेंबर १९२४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.