१६ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१२२२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म. (निधन: १३ ऑक्टोबर १२८२)

१८१४: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचा जन्म. (निधन: १८ एप्रिल १८५९)

१८२२: बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.

१८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म. (निधन: ६ मे १९६६)

१९०९: मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (निधन: १४ जुलै १९९८)

१९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांचा जन्म.

१९६४: ब्राझीलचा फुटबॉलपटू बेबेटो यांचा जन्म.

१९७८: भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.