१६ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

१९५६: खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १८९३)

१९६८: कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८९२)

१९९४: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ जुलै१९१२)

१९९६: उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आर. डी. आगा यांचे निधन.

२०००: सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ बेल्लारी शामण्णा केशवान यांचे निधन.

२००१: मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.