१६ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१९०९: समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८४२)

१९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)

१९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)

१९६६: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)

१९६७: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०१)

१९८८: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)

१९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या.

२०००: मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत त्रिलोकीनाथ कौल यांचे निधन.

२००३: सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक रामविलास जगन्नाथ राठी यांचे निधन.

२००५: संगीतकार, पेटीवाले मेहेंदळे उर्फ श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.