१६ जुलै रोजी झालेल्या घटना.

६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.

१६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.

१९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.

१९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.

१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.

१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.

१९९२: भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.

१९९८: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.