१६ जुलै रोजी झालेले जन्म.

१७७३: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)

१९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९९६)

१९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)

१९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)

१९१७: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९७८)

१९२३: भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव यांचा जन्म.

१९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ यांचा जन्म.

१९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)

१९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)

१९६८: भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.

१९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.

१९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म.

१९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.