१६ जून रोजी झालेल्या घटना.

१९०३: फोर्ड मोटर कंपनीची सुरवात झाली.

१९११: न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग (आय. बी. एम.) कंपनीची स्थापना.

१९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका.

१९४७: नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

१९६३: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला अंतराळयात्री बनली.

१९९०: मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.

२०१०: तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.