१६ मार्च रोजी झालेले जन्म.

१६९३: इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १७६६)

१७५०: जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिना हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८)

१७५१: अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १८३६)

१७८९: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८५४)

१९०१: भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९८१)

१९१०: ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९५२)

१९२१: सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१९३६: संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म.

१९३६: चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म.

१९३६: एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.