१६ मार्च रोजी झालेले मृत्यू.

१९४५: अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांचे निधन. (जन्म: १३ जून १८७९)

१९४६: जयपूर अत्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८५५)

१९९०: संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि. स. पागे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९१०)

२००७: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचे निधन. (जन्म: ४ मे १९८४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.