१६ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

ई. पु. ४२: रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च ३७)

१८३६: हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १८९१)

१८९४: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७५)

१८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)

१९०४: नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९९६)

१९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)

१९१७: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९९१)

१९२७: मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.

१९२८: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००६)

१९३०: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९९७)

१९६३: अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म.

१९६८: भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०१४)

१९७३: बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.