१६ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

१९३९: पदमश्री पुरस्कार विजेते, भारतीय संथाली भाषाशास्त्रज्ञ आणि आदिवासी हक्कांचे वकील दिगंबर हंसदा यांचा जन्म. (निधन: १९ नोव्हेंबर २०२०)

१६७०: शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १७१६)

१८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९०९)

१८४४: अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान इस्माईल क्यूम्ली यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९१९)

१८५४: आयरिश लेखक व नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९००)

१८८६: इस्राईल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरीयन  यांचा जन्म.

१८९०: वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७)

१८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९७४)

१९०७: कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८२)

१९२६: केबल विजन आणि एचबीओ चे संस्थापक चार्ल्स डोलन यांचा जन्म.

१९४८: अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक हेमा मालिनी यांचा जन्म.

१९४९: भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार क्रेझी मोहन यांचा जन्म.

१९५९: मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून २०१०)

१९८२: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन यांचा जन्म.

२००३: नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.