१७ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१४७८: हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.

१८२०: बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १८९२)

१८३७: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९१३)

१८९१: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७३)

१८९७: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१)

१९१६: जगातील पहिल्या महिला तर श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०००)

१९५१: चित्रपट अभिनेत्री बिंदू यांचा जन्म.

१९६१: बिलियर्डसपटू गीतसेठी यांचा जन्म.

१९७२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.