१७ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१७०६: लेखक आणि संशोधक बेंजामीन फ्रँकलिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)

१८९५: लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७८)

१९०५: भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म.

१९०६: भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २०००)

१९०८: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९९४)

१९१७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)

१९१८: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे २०१४)

१९१८: चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’माल अमरोही यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)

१९३२: साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९३)

१९४२: अमेरिकन मुष्टियोद्धा मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.