१७ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१७९०: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचे निधन. (जन्म: ५ जून १७२३)

१९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.  (जन्म: १४ एप्रिल १९१४)

१९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९१६)

२००५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.

२०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२८)

२०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)

२०२०: पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रख्यात भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक सी. शेषाद्री यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९३२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.