१७ जून रोजी झालेल्या घटना.

१६३१: ताजमहाल जिच्या साठी बांधला ती मुमताज बाळाला जन्म देताना मरण पावली.

१८८५: न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.

१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.

१९४४: आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९६३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

१९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.

१९९१: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

२०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.