१७ मे रोजी झालेले जन्म.

१७४९: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८२३)

१८६५: मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९)

१८६८: डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९२०)

१९३४: ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.

१९४५: लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म.

१९५१: गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.

१९६६: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)

१९७९: अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.