१७ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

१८१७: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १८९८)

१८६९: भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९२२)

१८९२: कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६८)

१९१७: वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोर यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९४)

१९३०: अटकिन्स आहार चे निर्माते रॉबर्ट अटकिन्स  यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००३)

१९४७: चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सिम्मी गरेवाल यांचा जन्म.

१९५५: अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९८६ – मुंबई)

१९६५: श्रीलंकेचे क्रिकेटपटू अरविंद डिसिल्व्हा यांचा जन्म.

१९७०: भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.