१७ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१७७२: अफगणिस्तानचे राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) यांचे निधन.

१८८२: इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८१४)

१८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव्ह किरचॉफ यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८२४)

१९०६: जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली. (जन्म: २२ ऑक्टोबर १८७३)

१९८१: भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२७)

१९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०७ – पालिताणा, गुजराथ)

२००८:  ललित लेखक रविन्द्र पिंगे यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १९२६)

२००८: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक बेन व्हिडर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.