१७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९)

१८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

१८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.

१८८५: पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)

१९००: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५)

१९०६: श्रीलंकेचे २रे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६)

१९१४: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)

१९१५: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून २०११)

१९२२: अँगोलाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो  यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९७९)

१९२९: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)

१९३०: व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

१९३२: भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.

१९३७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.

१९३८: लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००९)

१९३९: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)

१९४५: भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.

१९५०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.

१९५१: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.

१९८६: भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.