१८ एप्रिल रोजी झालेल्या घटना.

१३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

१७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.

१८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली.

१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.

१८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.

१९१२: टायटॅनिक मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन कार्पेथिया हे जहाज न्यूयॉर्कला पोचले.

१९२३: पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली.

१९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.

१९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.

१९३०: आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.

१९३६: पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.

१९५०: आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

१९५४: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.

१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.

२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.