१८ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१८५९: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८१४)

१८९८: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा. (जन्म: २४ जून १८६९)

१९४५: व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८४९)

१९५५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १८७९)

१९६६: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८८३ – डभई, गुजराथ)

१९७२: विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)

१९९५: पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते यांचे निधन.

१९९९: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२ – जयपूर)

२००२: महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष शरद दिघे यांचे निधन.

२००२: नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडल यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.