१८ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)

१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)

१७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.

१८७२: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)

१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)

१९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)

१९२३: लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९५५)

१९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.

१९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.

१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.

१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.

१९८०: अभिनेत्री प्रीती जंघियानी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.