१८ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१४८६: योगी चैतन्य महाप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १५३४)

१७४५: बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च १८२७)

१८२३: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२)

१८३६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

१८७१: थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९३३)

१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९)

१८९८: फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८)

१९११: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०००)

१९१४: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७६)

१९२६: अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)

१९२७: संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ खय्याम यांचा जन्म.

१९३३: अभिनेत्री नवाब बानू ऊर्फ निम्मी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.