१८ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१७९३: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १८४७)

१८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)

१८५४: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.

१८८९: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९३१)

१८८९: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)

१८९२: अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.

१९३३: अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.

१९३३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

१९३७: आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी जॉन ह्यूम यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट २०२०)

१९५२: चंदन तस्कर वीरप्पन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर २००४)

१९६६: रशियन बुद्धिबळपटू अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म.

१९७२: भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा जन्म.

१९९५: साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.