१८ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१९३६: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८६५)

१९४७: भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०४)

१९६७: कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.

१९७१: भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.

१९९३: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०५)

१९९६: अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२३)

२००३: हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.