१८ जुलै रोजी झालेल्या घटना.

६४: रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.

१८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.

१८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना.

१९२५: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.

१९६८: कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.

१९७६: मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.

१९८०: भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.

१९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.

१९९६: तामिळ टायगर्स नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.