१८ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१८१७: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७५)

१८९२: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)

१९६९: लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाणाऊ साठे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२०)

१९८९: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोविंद भट यांचे निधन.

१९९४: ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ. मुनीस रझा यांचे निधन.

२००१: सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.

२००१: वेस्ट इंडीजचे कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचे निधन. (जन्म: २८ जून १९३४)

२०१२: चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांचे निधन.

२०१३: भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)

२०२०: भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते संजीव सॅम गंभीर यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९६२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.