१८ जून रोजी झालेले मृत्यू.

१८५८: झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)

१९०१: मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४३)

१९०२: इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८३५)

१९३६: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १८६८)

१९५८: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९००)

१९६२: पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे यांचे निधन.

१९७४: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९६)

१९९९: साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.

२००३: हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते जानकीदास यांचे निधन.

२००५: भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१४)

२००९: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९२२ – शिबपूर, कोमिल्ला, बांगला देश)

२०२०: परम विशिष्ठ सेवा पद आणि वीर चक्र सन्मानित मेजर-जनरल लच्छमानसिंग लेहल यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९२३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.