१८ मार्च – जन्म

१८ मार्च रोजी झालेले जन्म.

१५९४: शहाजी राजे भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १६६४)

१८५८: डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३)

१८६७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९४४)

१८६९: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०)

१८८१: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९५६)

१९०१: शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.

१९०५: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१)

१९१९: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी २००१)

१९२१: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०१२)

१९३८: अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म.

१९४८: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००५)

१९८९: भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवत्स गोस्वामी यांचा जन्म.