१८ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.

१४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.

१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.

१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.

१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

१९१८: लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.

१९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.

१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

१९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

१९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.

१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.

२०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

२०१५: भारतीयशटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीयशटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीयशटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५: भारतीय महिला दुहेरीशटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.

२०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.