१८ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.

१७७२: मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)

१८३०: इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १७४८)

१९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)

१९६२: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८८५)

१९९३: लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.

१९९६: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.

१९९८: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६)

१९९८: सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.

१९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन.

२००१: नाडेप कंपोस्ट खताचे जनक नारायण देवराव पांढरीपांडे तथा नाडेप काका यांचे निधन.

२००६: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९१७)

२०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९२९)

२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.