१८ सप्टेंबर – जन्म

५३: रोमन सम्राट ट्राजान यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११७)

१७०९: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)

१९००: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)

१९०५: हॉलीवूड अभिनेत्री ग्रेटा गार्बो यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९९०)

१९०६: हिन्दी हास्यकवी प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ – हाथरस, उत्तर प्रदेश)

१९१२: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक राजा नेने यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५)

१९४५: मॅक्फि चे संस्थापक जॉन मॅक्फि यांचा जन्म.

१९५०: भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००९)

१९६८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी उपेंद्र राव यांचा जन्म.

१९७१: अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म.